शब्दांचे बोल !!!
कधी कधी शब्दांनाही अचानक, पण बोलावसं वाटतं!
मनात साचलेलं वादळ मग ओठातून फवारंत वाहतं...!
हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं ते , दडपण बोलून मोकळं होतं !
काठावरच्या एकांतात क्षितिजा बरोबर बोलतं !
फेसाळलेल्या लाटांबरोबर , मनमुराद हासतं !
येणार्या जाणार्या लाटा मोजत त्यातचं रमतं !
पुन्हा त्याच आठवणीत घुटमळतं , नव्या अन् ,जुन्या , आठवणीत ते हासतं !
काही नाती आयुष्यातून निघून जातात, पण शब्द मात्र कायमचे , हृदयात घर करून राहतात !
काही शब्द कठपुतळी सारखे बोलतात , ओठात काय , मनात काही दुसरंच काहीसं बरळतात !
वाहणाऱ्या अश्रूंनाही मग, शब्द हसण्याची सवय लावतात...!
— संदीप सु. श. परुळकर