#१४

वाचाळ चाळ !!!

एकदा एका चाळीला , शेजारची चाळ म्हणाली , " काय गं बाई ! इतक्या जवळ , आपण कित्येक वर्षे रहातोय , कधी आपलं भांडण बिंडण नाही !

पण चाळीतल्यां भांडणाच्या मजा , खुप सोसल्या तु आणि मीही ! सगळ्यांची ऊणीदुणी , ऐकलीत आपण मिळून काही !

आठवतयं मला , चाळीत भांडण झालं, सगळे जमा झाले. एक म्हणतो माझी चप्पल, दुसरा म्हणतो ती माझीच आहे !

एक म्हणतो माझ्या तारेवर . कपडे का वाळता घातले ? दुसरा म्हणतो माझा पेपर, तु कां घेतला रे ?

एक म्हणतो माझा बादली, दुसरा म्हणतो ती माझी आहे ! दुसरा म्हणतो सर्वच बादल्या कां तुझ्या बापाच्या आहेत ?

एक म्हणाला माझ्या दारात , तुम्ही कचरा कां टाकला ? दुसरा म्हणाला तो तर , तुझ्यावरच वारर्याने ऊडवला !

एक म्हणाला तुम्ही , मधल्या भिंतीवर दुपारी , ठोकाठोक करु नका , दुसरा म्हणे तुम्ही रात्रभर, काॅटची कुरकुर करू नका !

नळावरच्या भांडणाची तर , मजाच काही न्यारी , नंबर लावण्याची घुसण्याची , कसब काहींची लय भारी !

एक दारुडा मधेच झिंगत येई , शेजारच्या यमीला धक्या मारून जाई , चाळीतील चांडाळ चौकडी मग , त्याचला धू ढधू धुवून घेई !

सगळे भांडत होते, पण एक वेडा हसत होता. तो म्हणला, "अरे तुम्ही असे भांडू नका, तुम्ही कां वेडे आहात "असे विचारत होता !

सगळे भांडत होते, दुसरा पण एक वेडा हसत होता, "अरे भांडू नका, " गुण्यागोविंदाने रहा "असे सकला समजवत होता !

— संदीप सु. श. परुळकर