शब्दांचे मौन!!!
कधी कधी शब्दांनाही अचानक मुकेपण येतं, मनात साचलेलं वादळ मग डोळ्यांतून वाहतं...!
हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं ते न सांगितलेलं दुःख, फक्त रात्रीच्या एकांतात उशीला कळतं...!
कितीही सावरलं स्वतःला तरी, मन पुन्हा जुन्याच वळणावर रेंगाळतं, विसरलो सगळं म्हणता म्हणता, पुन्हा त्याच आठवणीत घुटमळतं...!
काही नाती आयुष्यातून निघून जातात, पण हृदयात मात्र कायमची घर करून राहतात, आणि वाहणाऱ्या अश्रूंनाही मग, मुकाट्याने हसण्याची सवय लावतात...!
असं जगावं की , आपली उपस्थिती , जगाला नाही जाणविली तरी चालेल , पण, अनुपस्थिती मात्र सर्वांना हळहळून जाणवेल !
— संदीप सु. श. परुळकर